PM Kisan सन्मान निधी योजने अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 11 हप्ते देण्यात आले आहेत. या योजने अंतर्गत रजिस्टर्ड शेतकऱ्यांना सरकार कडून सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम जमा केली जाते. मात्र ही योजना सुरू झाल्यापासून या योजनेच्या नियमांमध्ये अनेक बदल झाले आहेत.
PM Kisan या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सरकार कडून e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. तसेच जे शेतकरी KYC करणार नाहीत, त्यांना 12वा हप्ता मिळणार नाही, असे सरकारकडून म्हंटले गेले आहे.
PM Kisan साठी दोन प्रकारे e-KYC करता येते. यातील पहिली केवायसी प्रक्रिया PM किसानच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन करता येते. याशिवाय, जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊनही KYC करता येते. इथे हे लक्षात घ्या की, जर शेतकऱ्यांनी स्वत: OTP द्वारे e-KYC केले तर त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. मात्र कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन e-KYC करण्यासाठी पैसे द्यावे लागतील.
Csc मध्ये बायोमेट्रिक पद्धतीने KYC केले जाईल. यासोबतच लाभार्थी शेतकऱ्याचे आधार कार्ड आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर देखील आवश्यक असेल. CSC वर ई-केवायसीची फी 17 रुपये आहे. याशिवाय काही csc ऑपरेटर 10 रुपये ते 20 रुपये सर्व्हिस चार्ज देखील घेतात. अशा प्रकारे CSC कडून e-KYC साठी 37 रुपये द्यावे लागतील.
अशा प्रकारे ऑनलाइन KYC करता येईल सर्वांत आधी पीएम किसान वेबसाइट https://pmkisan.gov.in/
वर
जा.
त्यानंतर ‘फार्मर्स कॉर्नर’ अंतर्गत e-KYC टॅबवर क्लिक करा. जे पेज उघडेल त्यावर आधार क्रमांकाची माहिती द्या आणि सर्च टॅबवर क्लिक करा. यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल. त्यानंतर सबमिट OTP वर क्लिक करा आणि OTP टाकून सबमिट करा. आता e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल. यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.