सरल वास्तु’ फेम ज्योतिषाचार्य चंद्रशेखर यांची मंगळवारी दुपारी कर्नाटकातील हुबळी येथील एका हॉटेलमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली. मारेकरी अनुयायींच्यी वेशभूषेत आले होते. मारेकरी ज्योतिषाचार्यांना नमस्कार करण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी चाकूने तब्बल त्यांच्यावर 70 वार केले. ही घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.कर्नाटक पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणी दोन आरोपींनी बेळगाव जिल्ह्यातून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतिषाचार्याची हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी बेलगाव जिल्ह्यातील रामदुर्गा येथे पसार झाले होते. पोलिसांनी रामदुर्गा येथून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून आरोपींचा शोध घेतला. दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -