चंदीगड; पपंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (वय ४८) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहेत. उद्या चंदीगड येथील त्यांच्या खासगी निवासस्थानी त्यांचा विवाह होणार आहे. भगवंत मान यांचे लग्न डॉ. गुरप्रीत कौर यांच्याशी होणार आहे.
या विवाहसोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री मान यांचे पहिले लग्न झाले आहे. पण ६ वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता. आता दुसऱ्यांदा ते विवाहबंधनात अडकणार आहेत.