शिवाजी पेठेतील ताराबाई रोडवर असणार्या आझाद हिंद तरुण मंडळ प्रणित दयावान ग्रुपने रविवारी सायंकाळी मंडळासमोर साऊंड सिस्टीम लावली. तसेच विद्युत रोषणाईही करण्यात आली.
यावेळी मंडळासमोर कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. बेकायदेशीर कार्यकर्ते जमवून रस्त्यावर गोंधळ घातल्याप्रकरणी मंडळाच्या पदाधिकार्यांसह ३० कार्यकर्त्यांविरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. साऊंड सिस्टीम, शार्पी, ब्लेंडर लाईट असे ७५ हजारांचे साहित्यही जप्त करण्यात आले.
दयावान मंडळाने रविवारी सायंकाळी मंडळासमोर साऊंड सिस्टीम लावली. या मार्गावरून जाणारे तरुण मोठ्या संख्येने येथे जमण्यास सुरुवात झाली. विद्युत रोषणाईत सर्वांनी ठेका धरल्याने मुख्य रस्त्यावर मोठी गर्दी जमली. पोलिसांना याची माहिती मिळताच मंडळा जवळ येऊन साहित्य जप्त केले.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सुरेश सुतार, महेश चौगुले, प्रमोद सुतार, मानसिंग पवार, अजिंक्य सूर्यवंशी, प्रथमेश मोरे, स्वप्निल लोहार, वैभव सूर्यवंशी, प्रणव मोरे, यश सुतार, तेजस मोरे, शुभम तोडकर, योगेश पाटील, अतुल शिंदे, सतीश सुतार, समीर वर्णे, अक्षय साबळे, विद्युत रोषणाईचा मालक इंद्रजीत ऐनापुरकर याच्यसह १० ते १२ जणांचा समावेश आहे.