साक्षगंध झाल्यानंतर लग्नाचा मुहूर्त निघाला. वधुपित्याने मुलीच्या लग्नाच्या पत्रिका छापून त्या नातेवाईकांना वाटल्याही. परंतु, ऐनवेळी नवरदेवाने हुंड्याची मागणी केली.
वधु पित्याने हुंडा (Dowry) देण्यास नकार दिल्याने नवरदेव लग्नमंडपात आलाच नाही. लाखनी शहरातील आदर्शनगरात हा प्रकार घडला असून याप्रकरणी नवरदेवाविरुद्ध लाखनी पोेलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लाखनी येथील आदर्शनगरातील तरुणीचे लग्न वर्धा येथील केळकरवाडी येथील राजेंद्र वामनराव शिंदे याच्यासोबत जुळले. १५ आॅगस्ट रोजी साक्षगंध होऊन १६ सप्टेबर ही लग्नाची तारीखसुद्धा निघाली.
वधुपित्याने नवरदेवाला लग्नाचे कपडे घेण्याकरीता पैसेसुद्धा दिले होते. काही दिवसातच लग्न होणार असल्याने वधुपित्याने लग्नपत्रिका छापून नातेवाईकांना वाटून दिल्या. सभागृहाची बुकींग केली. तसेच लग्नात लागणाºया सर्व साहित्यांची खरेदी केली होती.
दरम्यान, ऐनवेळी नवरदेवाने दोन तोळ्याचा गोप आणि दोन ट्रॅव्हल्सचा खर्च हुंडा (Dowry) म्हणून मागितला. वेळेवर नवरदेवाने हुंड्याची मागणी केल्याने वधुपित्याने हुंडा देण्यास नकार दिला. या कारणाने नियोजित लग्नात नवरदेव मंडपात आलाच नाही. त्यामुळे तरुणीचे लग्न होऊ शकले नाही.
याप्रकरणी वधुपित्याने लाखनी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन राजेंद्र वामनराव शिंदे रा. केळकरवाडी जि. वर्धा याच्याविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हुंडा न दिल्याने नवरदेव मंडपात आलाच नाही!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -