Tuesday, May 21, 2024
Homenewsवीज कोसळल्याने शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

वीज कोसळल्याने शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू


कुरणेवाडी (बारामती) येथे अचाकन पाऊस कोसळायला सुरूवात झाल्यानंतर शेतकरी दाम्पत्य एका झाडाच्या आडोशाला गेले. पण, त्याच झाडावर वीज कोसळल्याने या दाम्पत्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

बारामती तालुक्यातील कुरणेवाडी गावच्या हद्दीत सगोबाचीवाडी येथे सोमवारी (दि. २०) दुपारी साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली. बाळासाहेब बंडोबा घोरपडे (वय – ५४) आणि त्यांच्या पत्नी संगीता बाळासाहेब घोरपडे (वय-४४) अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
या घटनेत बाळासाहेब यांच्या दुसऱ्या पत्नी पद्ममिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घोरपडे यांची पणदरे खिंडीजवळ शेतजमीन आहे. सोमवारी दुपारी पावसाने अचानक कोसळायला सुरूवात केली. शेतात काम करणारे हे तिघे एका झाडाच्या आडोशाला बसले. पण, अचानक वीजेचा मोठा कडकडाट झाला. ही वीज त्यांनी आसरा घेतलेल्या झाडावरच कोसळली.
या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी बारामतीला हलविण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच बाळासाहेब यांचा मृत झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. काही वेळातच संगीता यांचाही मृत्यू झाला. पद्मिनी यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या दुदैवी घटनेनंतर बारामती तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी तातडीने धाव घेत मदतकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -