मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न, बीडच्या नवले दाम्पत्याला महापूजेचा मान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी सहकुटूंब आणि सपत्निक विठ्ठलाची पूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत मुरली भगवान नवले आणि जिजाबाई मुरली नवले या वारकरी दाम्पत्याला यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला.बळीराजा सुजलाम सुफलाम होऊ देत, मुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाला साकडं
बळीराजा सुजलाम सुफलाम होऊ देत, मुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाला साकडं यंदा राज्यभरात चांगल्या पावसाला सुरुवात झालेली असल्याने सगळीकडे पेरण्या सुरू झाल्या आहेत. काहीसा उशिरा का होईना पण राज्यातील शेतकरी सुखावला आहे. हा पाऊस असाच कायम राहून सगळीकडे उत्तम पीकपाणी येऊ देत असं साकडं मुख्यमंत्र्यांनी यावेळी विठ्ठलाला घातलं.
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास
मुख्यमंत्र्यांनी मंदिर समितीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन पंढरपूर शहराचा तिरुपतीच्या धर्तीवर सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रारूप आराखडा तयार करून सादर करण्याचा सूचना संबंधित अधिकाऱ्याना दिल्या. महापुजेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते मानाचे वारकरी असलेल्या नवले पती पत्नीचा यथोचित सन्मान करण्यात आला.