ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ; राज्याच्या मंत्रिमंडळात जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे आणि अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यापैकी कोणाला स्थान मिळणार, याची चर्चा आहे. कोरे आणि आवाडे या दोघांनीही विधानसभेच्या निकालानंतर भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मंत्रिपद कोणाला मिळणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, याची चर्चा सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून विनय कोरे आणि प्रकाश आवाडे यांनी सुरुवातीपासूनच भाजपला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर हे आता शिंदे गटात आहेत. त्याचबरोबर शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्राकवर हे अपक्ष निवडून आले व त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. शिवसेनेच्या कोट्यातून ते राज्यमंत्री झाले. तेही आता शिंदे गटात आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठी चुरस आहे.