पलूस : येथे आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीत कुंडल येथील आई तुळजाभवानी प्रसन्न बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. या बैलगाडीस 1 लाखाचे रोख रकमेचे बक्षीस व ढाल देण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन सोनहिरा साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांच्याहस्ते करण्यात आले.
काँग्रेसचे युवक नेते रोहन लाड यांनी याचे आयोजन केले होते. जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ए. डी. पाटील, मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. बापू जाधव, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव पुदाले, युवक नेते ऋषीकेश लाड, वैभव पुदाले, सुधीर जाधव, सुनील सावंत, हेमंत पाटील, राजू खारगे, पोपट थोरबोले, अमोल भोरे, प्रल्हाद शितापे, विजय आरबुने व कार्यकर्ते उपस्थित होते.