मुंबई : बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्नानंतर चित्रपटसृष्टी सोडली. या लिस्टमध्ये अनेक अभिनेत्रींची नावे येतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने अभिनेता इमरान हाश्मीसोबत बोल्ड सीन दिले होते. चित्रपटातील या दोघांच्या इंटीमेट सीनची खुप चर्चा रंगली होती. ही अभिनेत्री नेमकी आहे कोण आणि ती कशी दिसते ते जाणून घेऊयात. अभिनेत्री उदिता गोस्वामी ही उत्कृष्ट अभिनेत्री आहे.
ज्यावेळेस बॉलिवूडमध्ये इमरान हाश्मीच्या चित्रपटाची क्रेझ होती. त्याचवेळेस अभिनेत्री उदिता गोस्वामी चर्चेत आली होती. तिने इमरान हाश्मीसोबत अनेक चित्रपटात बोल्ड सीन्स दिले होते. या सीनचे प्रेक्षक खुपच वेडे झाले होते. उदिता गोस्वामीने फार कमी चित्रपटांमध्ये काम केले, पण तिने चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले. उदिता गोस्वामीने इमरान हाश्मीसोबत ‘जहरे’ आणि ‘अक्सर’ सारख्या चित्रपटात काम केले होते.