नवी दिल्ली : विजय माल्याला न्यायालयाच्या अवमान प्रकरणी 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात निर्णय सुनावला जाणार आहे. हा निर्णय न्यायाधीश यू. यू. यांच्या सह तीन न्यायाधीशांच्या (judge) खंडपिठासमोर होईल. 10 मार्चला विजय माल्याच्या विरोधातील निर्णय न्यायालयानं राखून ठेवला होता. 9 मे 2017 ला सर्वोच्च न्यायालयाने विजय माल्याला न्यायालयाच्या अवमान प्रकरणी दोषी ठरविलं होतं. विजय माल्यानं संपत्तीशी (estate) संबंधित माहिती न्यायालयात सादर केली नव्हती. विजय माल्याने डीएगो डीलमधून सुमारे 40 मिलीयन डॉलर आपल्या मुलांच्या खात्यात वळते केले. त्याला न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन मानले जात आहे. न्यायालयाच्या संमतीशिवाय विजय माल्याला ट्रान्झेक्शन करू शकत नव्हता. तरीही त्यानं तसं केलं. डीएगो डीलमधून मिळालेले 40 मिलियन डॉलर सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीत जमा करावेत, अशी मागणी बँकेनं केली होती.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -