मुंबई- उद्या म्हणजेच ११ जूलै रोजी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या निलंबणाच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस शिवसेनेसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे महाराष्ट्रासह अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने उद्या सुनावणीत जर १६ आमदारांचं निलंबन केल्यास शिवसेनेला इतर सर्वच बंडखोर आमदारांना अपात्र करता येईल.
तसेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. तसेच राज्यात मध्यावधी निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.