Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंगशिंदे सरकार राहणार की जाणार? महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचा आज सुप्रीम कोर्टात फैसला

शिंदे सरकार राहणार की जाणार? महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचा आज सुप्रीम कोर्टात फैसला

महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचा (Political future of Maharashtra) फैसला आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील सरकार राहणार की जाणार याकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांची (Sena rebel MLAs) आमदारकी जाणार की राहणार यावर आज सुप्रीम कोर्ट (Supreme Court) निर्णय देणार आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केले. त्यामुळे शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली आणि बंडखोरी करणाऱ्या आमदारांपैकी 16 आमदारांना अपात्र करण्याची विनंती विधानसभा उपाअध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली होती. त्यावर उपाध्यक्षानी या आमदारांना नोटीस पाठवून 48 तासांच्या आत उत्तर देण्यास सांगितले होते. परंतु या नोटिसीला उत्तर न देता 16 बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असल्याचे न्यायायलयात सांगितले. त्यावेळी न्यायालयाने ही सुनावनी 11 जुलैपर्यंत पुढे ढकलली होती. आज त्यावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागू आहे.

दरम्यानच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकार अल्पमतात आल्यामुळे कोसळलं आणि शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करून नवीन सरकार स्थापन केले. परंतु तरीही आजची सुनावणी खूप महत्वाची आहे. काही माध्यमांतील वृत्तानुसार सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीबाबत अनिश्चितता आहे. कारण सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी शिवसेनेचे वकील आज कोर्टात विनंती करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आज ही सुनावणी होणार का? शिंदे सरकारचं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -