Tuesday, December 24, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी ; यंत्रमाग व्यवसायातील समस्या संदर्भात निवेदन

इचलकरंजी ; यंत्रमाग व्यवसायातील समस्या संदर्भात निवेदन

इचलकरंजी शहरातील लोक क्रांती विकास आघाडीच्या वतीने प्रांताधिकारी विकास खरात यांना यंत्रमाग व्यवसायातील समस्या संदर्भात दिले निवेदन यावेळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजी शहरातील लोक क्रांती विकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले इचलकरंजी शहर हे महाराष्ट्राचे मँचेस्टर नगरी म्हणून ओळख असणाऱ्या इचलकरंजी शहरात यंत्रमाग व्यवसाय हा मोठया प्रमाणावर असून त्या व्यवसायावर शहरातील बरेच लोक अवलंबून असल्यामुळे व त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत असल्या कारणाने तो व्यवसाय कायमस्वरुपी अखंडपणे चालू राहण्याच्या दृष्टीने आपणांस नम्रपणे आवाहन करणेत येते की , यंत्रमाग कामगारांच्या व ट्रेडिंग कंपन्या व खर्चेवाले कारखानदार यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे इचलकरंजी शहरातील साधे यंत्रमाग , ॲटोलूम्स , रॅपिअर असे सर्व कारखाने नियमित चालू ठेवून कामगारांना उपासमारीपासून परावृत्त करण्याचे आदेश यंत्रमागधारकांना पारित होणेकरीता F जावक ) कारी कालर नाग इचलकरंजी कामगारांना किमान वेतन कायदा लागू करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेत चावी असे आदेश यंत्रमागधारकांना देणेत यावेत .

यंत्रमाग कामगारांची मजूरीबाबत यंत्रमागधारक व कामगार संघटना यांचेमध्ये चर्चा व वाटाघाटी करुन मजूरींचे दर ठरविण्यात यावेत . केंद्र शासनाच्या नविन धोरणांनुसार कामगारांना सन्मान योजनेअंतर्गत ‘ वार्षिक रु .५,००० / – मंजूर करणेबाबत केंद्र शासनस्तरावर आपणांकडून पाठपुरावा करण्यात यावा ही योजना कर्नाटक शासनाने आपल्या राज्यात लागू करून कामगारांना जगण्यासाठी प्रेरित केले आहे . त्याप्रमाणे आपल्या राज्यात सुध्दा ती योजना चालू करणेत यावी . सुताचे दर ट्रेडिंग कंपन्या व यंत्रमागधारक यांच्यात बैठक होवून सूताचे दर किमान तीन महित्यांनाकरीता स्थिरत ठेवण्याबाबतची अंमलबजावणी व आदेश व्हावेत . सूताला जिवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ठ करण्यासाठी वरीष्ठ स्तरावर या बाबतीत शहरातील खासदार , आमदार , ट्रेडिंग कंपन्या , सूत गिरण्या , यंत्रमागधारक , कामगार तसेच कामगार संघटना यांची संयुक्त बैठक घेवून त्यातून सुकर असा सर्वसमावेशक असा मार्ग काढावा यंत्रमागधारकांची विज बिले वाढलेली आहेत . ती कमी करणेत यावीत जेणेकरून कारखाने चालविणे यंत्रमागधारकांना सोयीस्कर व फायदेशीर होईल लोक क्रांती विकास आघाडीच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी शोभा वसगडे शबाना शहा सलीम मालगावे महादेव कामे व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -