राज्यात सोमवारी सलग पाचव्या दिवशी सोमवारीही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे राज्याच्या बहतांश भागांतील नद्यांना पूर आला आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी ‘रेड अलर्ट’ पुकारला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अजूनही अतिवृष्टी होत आहे. मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरूच आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, 21 जुलैपर्यंत पाऊस धो धो बरसणार आहे. गुजरातच्या किनारपट्टीपासून ते कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत गेल्या पाच दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. उत्तर पूर्व बंगालच्या उपसागरापासून ते ओडिशाच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पुढील 48 तासांत या पट्ट्याची तीव्रता आणखी वाढणार आहे.
रेड अलर्ट : कोल्हापूर (घाट) : 12 जुलै, पालघर : 11 ते 14 जुलै , रायगड : 12, 13 जुलै, रत्नागिरी : 12 जुलै, नाशिक (घाट) : 12 ते 14 जुलै, पुणे (घाट) : 12 ते 14 जुलै