किरकोळ कारणावरून बापाने मुलावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी येथील तुजारपूर रस्त्यावरील शेतात घडला. या हल्ल्यात ओंकार दीपक जाधव (वय 19, रा. उदय चौक, इस्लामपूर) हा जखमी झाला. वडील दीपक सखाराम जाधव याच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ओंकार याने फिर्याद दिली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ‘तू माझ्या बोअरचे पाणी पाजायचे नाही, शेतात वैरण काढायची नाही व माझ्या शेतात यायचे नाही’, असे म्हणून वडील दीपक याने मुलगा ओंकार याला शिवीगाळ केली. कोयत्याने हल्ला करून जखमी केले.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -