चंद्रपूर; जिल्ह्यात 5 दिवसांपासून संततधार पावसामुळे नदी नाले, धरण तुडूंब भरले आहेत. नद्यांनी पाण्याची पातळी ओलांडली असून वर्धा, वैनगंगा व इरई नदीला पूर आलेला आहे. यामुळे जिह्यातील अनेक मार्गाची वाहतूक बंद झाली आहे. चंद्रपूर शहराला लागून असलेल्या इरई धरणाचे 7 ही दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या इरई नदीमध्ये पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे. वर्धा नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने महाराष्ट्र – तेलंगणा मार्गाची वाहतूक ठप्प आहे. वर्धा नदीच्या पूलावरून पाणी वाहत जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. नदी, नाले भरभरून वाहत आहेत. धरणे भरली असून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर शहराला लागून असलेल्या इरई धरणाचे 7 ही दरवाजे उघडण्यात आले आहे.
त्यामुळे इरई नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे इरई धरणातील पाण्याच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातून वाहणाऱ्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठावरील गावांना हाय अलर्टचा इशारा दिलेला होता. त्यादृष्टीने प्रशासन सज्ज झाले आहे. महाराष्ट्र – तेलंगणाला राष्ट्रीय माहामार्गावरील वर्धा नदी पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मागील चार तासापासून हा मार्ग बंद आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत आहे. पाणी पुलावरून जात असल्याने प्रशासनाने या पुलावरील वाहतूक बंद केली आहे. वाहनांची दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे वाहतूक खोळंबली आहे. जिल्ह्यातील अनेक धरणे 100 टक्के भरली आहेत.