आमदार प्रकाश आवाडे व आमदार डॉ.विनय कोरे या दोघांना भारतीय जनता पक्षाच्या कोठ्यातून मंजीपद द्यावे, अशी मागणी माजी खासदार कल्लाप्पाना आवाडे व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचेकडे केली. भारतीय जनता पार्टी व एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट यांचे नुकतेच राज्यात सरकार स्थापन झाले आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाला आवाडे व कोरे यांनी पाठिंबा देत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हे दोन्ही नेते जेष्ठ व अनुभवी आहेत. त्यांचा राजकीय लाभ आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबरोबर महापालिका, नगरपालिका व साखर कारखाना निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कोठ्यातून यांना मंत्रीमंडळात संधी द्यावी. अशी मागणी माजी खासदार आवाडे व माजी आमदार महाडिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचेकडे मंगळवारी केली आहे. याबाबत महाडिक व आवाडे यांची छञपती राजाराम साखर कारखाना येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी राजाराम साखर कारखाना चेअरमन दिलीप पाटील, वडगाव बाजार समिती सभापती सुरेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे आदी उपस्थित होते.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -