Tuesday, December 24, 2024
Homeमहाराष्ट्रजिल्ह्यात मुसळधार पाऊस; १६ जुलैपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद!

जिल्ह्यात मुसळधार पाऊस; १६ जुलैपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद!

गडचिरोली, गेल्या ३ दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी १६ जुलैपर्यंत शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी १० जुलैला आदेश जारी केले आहेत. दि. १३ जुलैपर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये आणि खासगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते. त्यानंतर सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक नद्यांना पूर आला असून, कित्येक मार्ग बंद आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी नवा आदेश जारी करुन शाळा, महाविद्यालये आणि खासगी आस्थापना १६ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आज संध्याकाळी जारी केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -