Saturday, July 26, 2025
Homeकोल्हापूरपंचगंगेची पातळी 36 फूट 5 इंच : 59 बंधारे पाण्याखाली

पंचगंगेची पातळी 36 फूट 5 इंच : 59 बंधारे पाण्याखाली

ताजी बातमी ऑनलाईन टीम 

कोल्हापूर ; : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ सुरूच आहे. पंचगंगेची पाणी पातळी इशारा पातळीपासून केवळ तीन फूट दूर आहे. बुधवारी रात्री ही पातळी 36.5 फुटांवर गेली. जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेले असून, पुराचा धोका वाढला आहे. 100 हुन अधिक गावांशी पर्यायी मार्गाने संपर्क सुरू आहे.

जिल्हा प्रशासन ‘अॅक्शन मोड’मध्ये आले असून, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिवसभर शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील संभाव्य पूरबाधित परिसराची पाहणी केली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत हेलिपॅडसाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून, स्थानिक रेस्क्यू फोर्ससह संबंधितांना सज्ज राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

 

जिल्ह्यात बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या 24 तासांत सरासरी 31.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. बुधवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात पावसाची संततधार कायम होती. यानंतर पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी सायंकाळी पुन्हा अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाचा सायंकाळी जोर इतका होता की, अवध्या चारपाच फुटांवरीलही काही दिसत नव्हते.

 

धुवाँधार पावसाने अनेक रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहत होते. ठिकठिकाणी पाणी साचले. सायंकाळीच पाऊस आल्याने घराकडे परतणाऱ्यांचे हाल झाले. बाजारपेठा, भाजी मंडई, दुकाने आदी ठिकाणच्या गर्दीवर परिणाम झाला. बहुतांशी ठिकाणी जनजीवनावर परिणाम झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -