पुणे;राज्यात आणखी चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, 14 ते 17 जुलैपर्यंत कोकण, मुंबईसह पुणे या भागांना दक्षतेचा इशारा दिला आहे. 14 रोजी मुंबई, पुणे, नाशिक, पालघर या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ दिला आहे.
राज्यात आणखी चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, 14 ते 17 जुलैपर्यंत कोकण, मुंबईसह पुणे या भागांना दक्षतेचा इशारा दिला आहे. 14 रोजी मुंबई, पुणे, नाशिक, पालघर या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ दिला आहे.
ओडिशा किनारपट्टीसह बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने संपूर्ण राज्यात आगामी 48 तासांत मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून, सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा देण्यात आली आहे.
24 तासांत झालेला पाऊस मि.मी.मध्ये कोकण : माथेरान 217, वाडा 148, कर्जत 138, काळापूर 124, पालघर 123, लांजा 120, विक्रमगड 129, सुधागड पाली 110, चिपळूण 97, पेण 96. मध्य महाराष्ट्र : लोणावळा 185, महाबळेश्वर 142, गगनबावडा 120, राधानगरी 104, इगतपुरी, पौंड 100, वेल्हे 91, पेठ 90. मराठवाडा : किनवट 210, हिमायतनगर 195, मुखेड 180, भोकर 166, अर्धापूर 147, उमरी 146, भडगाव 145, धर्माबाद 139, नांदेड 132, बिलोली 110, पालम 106, पूर्णा 100.
ऑरेंज अलर्ट पालघर-15 जुलै, ठाणे-14 जुलै, मुंबई-14 जुलै, रायगड-14 जुलै, सिंधुदुर्ग-14 जुलै, पुणे (घाट)-15 जुलै, कोल्हापूर-14 जुलै, सातारा (घाट)-14, 15 जुलै, चंद्रपूर-17 जुलै, गडचिरोली-17 जुलै, नागपूर-14 जुलै, यवतमाळ-14 जुलै, चंद्रपूर-17 जुलै.