Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : दोन दिवस महत्वाचे; शहरावर पाणी संकटाची टांगती तलवार

कोल्हापूर : दोन दिवस महत्वाचे; शहरावर पाणी संकटाची टांगती तलवार

शहरासह धरणक्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. परिणामी महापालिकेचे नदी लगत असणाऱ्या उपसा केंद्राजवळ 542 मीटरवर पाणी आहे. आणखीन अडीच मीटर पाणी वाढल्यास शहरावर पाणी संकट येण्याची शक्यता आहे.भारतीय हवामान खात्याने आणखी दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. पुन्हा महापुरात 10 ते 12 दिवस पाणीपुरवठा बंद होण्याची टांगती तलवार असून शहरवासियांच्या दृष्टीने दोन दिवस फार महत्वाचे आहेत.

कोल्हापूर महापालिकेचे नदी लगत शिंगणापूर,नागदेववाडी आणि बालिंगा येथे उपसा केंद्र आहेत. 2019 आणि 2021 च्या महापुरात तीन उपसा केंद्र पाण्यात गेल्याने शहरातील 12 ते 14 दिवस पाणी बंद होते. टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ महापालिकेवर आली. सध्या पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदीची पातळी झपाटयाने वाढत आहे. बुधवारी 37 फुटांवर पातळी होती. यामुळे उपसा केंद्राच्या परिसरात पुराचे पाणी आले आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उपसा केंद्र पाण्यात बुडण्याचा धोका निर्माण झाला असून शहरावर पाणी संकटाची टांगती तलवार आहे.
उपसा केंद्राजवळील सध्याची पाणी पातळी-542 मीटर उपसा केंद्र पाण्यात जाणार-544.50 मीटर

ई वॉर्ड धोक्यात

दोन वेळा उपसा केंद्र पाण्यात गेल्याने शहरावर पाणीबाणीला सामोरे जावे लागले. अशी स्थिती पुन्हा होवू नये म्हणून महापालिकेने बालिंगा उपसा केद्रांमध्ये 300 एच.पीचे दोन सबमर्सिबल पंप बसविल्या आहेत. त्यामुळे बालिंगा उपसा केंद्रात निम्म्या शहरात दिवसाआडने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आणि डी वॉर्डला पाणीपुरवठा केला जाईल. ई वॉर्डला मात्र,पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. येथे टँकरनेचे पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -