आपल्या वापरकर्त्यांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी व्हॉट्सॲप अनेक नवीन वैशिष्ट्यांवर काम करत असताना व्हॉट्सॲप आता एका नवीन वैशिष्ट्यावर काम करत असल्याचे दिसून आले आहे. WhatsApp लवकरच तुमच्यासाठी व्हॉईस नोट हा पर्याय आणू शकते. या फिचरने व्हॉट्सॲप वापरकर्ते नक्कीच खुश होणार आहेत.
मिळालेल्या माहीतीनुसार, सध्या व्हॉट्सॲपवर आपण फक्त फोटो व व्हिडीओ स्टेटस म्हणून पोस्ट करू शकतो. पण लवकरच तुम्हाला आता व्हॉट्सॲपवर फक्त ऑडिओ व्हॉईसच्या रूपातील फाईल्स किंवा ज्याला आपण ऑडिओ नोट्स म्हणू शकतो, असं स्टेटस म्हणून पोस्ट करता येणार आहे.
Wabetainfo ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, स्टेटस टॅबच्या तळाशी एक नवीन पर्याय किंवा आयकॉन असू शकतो, ज्यामुळे यूजर स्टेटस अपडेट्सवर व्हॉइस नोट्स वापरण्यास सक्षम असेल. तुम्ही ज्याला तुमचा स्टेट्स दाखवण्याची परवानगी द्याल तुमचा तो कॉन्टॅक्ट हा ‘व्हॉइस स्टेटस’ ऐकू शकेल. सध्या या फीचरवर काम सुरू असल्याने हे फिचर कोणत्या स्मार्टफोन्सना सपोर्ट करेल, याबाबत कोणतीही अधिकृत माहीती नाहीये.
WhatsApp फीचर्स ट्रॅकर Wabetainfo नुसार, WhatsApp स्टेटसमध्ये खालील बाजूस व्हॉईस नोट सपोर्ट असा पर्याय देईल. स्टेटस अपडेट म्हणून शेअर केलेल्या व्हॉईस नोटला “व्हॉइस स्टेटस” असे म्हटले जाऊ शकते, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. याशिवाय व्हॉइस नोट तुमच्या स्टेटसवर शेअर केलेल्या इतर फोटो आणि व्हिडिओप्रमाणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल,” Wabetainfo ने माहीती दिली आहे.