Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : भरपावसात विद्यार्थ्यांना बसमधून उतरवले, आरटीओ अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार

कोल्हापूर : भरपावसात विद्यार्थ्यांना बसमधून उतरवले, आरटीओ अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार

वाठार, पेठवडगांव रस्त्यावर एका नामांकीत महाविद्यालयाच्या इचलकरंजीकडे निघालेल्या गाडीतील विद्यार्थिनींना एका मोटर वहान निरिक्षकाने भरपावसात रस्त्यावर उतरवून बसवरती कारवाई केली. या प्रकाराची संबधीत संस्थेच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार केली आहे.

दरम्यान, मोटर वाहन निरीक्षक पेठवडगांव परीसरात गेली दोन दिवस भर पावसात कारवाई करत सुटले आहेत. मंगळवारी एका नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यावरही कारवाई केली आहे. काल सांयकाळी पाचच्या सुमारास वठार वडगांव रोडवर एका महाविद्यालयाच्या गाडीतील विद्याथिर्नीना रोडवर उतरत मोटर वहान निरीक्षक यांनी आपली गाडी ही उलट दिशेने लावत असंवेदनशीलतेचा कळसच गाठला. या गाडीवर कारवाई करत असताना निदान पाऊस असताना बसमधील विद्याथिर्नीना उतरवणे चकीचे असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

अशा प्रकारे विद्यार्थ्यांना गाडीतून उतरवून कारवाई करणे चुकीचे आहे. मोटर वहान निरीक्षकाने आपल्या आधिकाराचा गैरवापर करणे आयोग्य असुन यांची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. तसेच प्रशासनाने यावर वचक ठेवणे गरजेचे आहे, असे यावेळी बोलले जात होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -