Saturday, August 2, 2025
Homeब्रेकिंगआजपासून राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

आजपासून राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

महागाईमुळे त्रस्त असलेल्या जनतेला राज्यातील शिंदे-भाजप सरकारने (Maharashtra Government) मोठा दिलासा दिला आहे. सत्ता स्थापनेनंतर मोठा निर्णय घेता गुरुवारी पेट्रोल लिटर मागे पाच रुपयांनी, तर डिझेल लिटर मागे तीन रुपयांनी (Petrol Diesel Prices Cut) स्वस्त केले. पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करत सरकारने हा मोठा दिलासा दिला आहे.

या निर्णयामुळे मुंबईसह (Mumbai) राज्यात बहुतांश ठिकाणी पेट्रोल 106.80 रुपये, तर डिझेल 94.80 रुपये (Petrol Diesel latest Price)  प्रती लिटरवर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संयुक्त पत्रपरिषदेत पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी केल्याची घोषणा केली. त्यानुसार पेट्रोल-डिझेलचे  नवे दर गुरुवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी सातत्याने व्हॅट कमी करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावेळी सरकारने निर्णय घेतला नव्हता. शिंदे-फडणवीस यांनी सत्ता येताच पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली.

उत्पादन शुल्कात कपात

पेट्रोल आणि डिझलच्या उत्पादन शुल्कात केंद्र सरकारने कपात केली आहे. मे महिन्यात केंद्राने हा निर्णय घेतला. त्यामुळे पेट्रोल व डिझेल दरात मोठी घट झाली होती. त्याच्या दोन दिवसांनी राज्यातील तत्कालीन सरकारनेही व्हॅट कमी केल्याचे सांगितले होते; पण त्याचा परिणाम दरांवर दिसला नाही. त्यामुळे 22 मेपासून पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर होते.

आता शिंदे सरकारने पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करत नागरिकांना दिलासा दिला आहे. पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सरकारवर 6 हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. मात्र, हा महसूल गेला तरी विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही, याची सरकार काळजी घेईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हे आहे नवीन दर

मुंबई   पेट्रोल 106.35 रुपये प्रती लिटर, डिझेल 94.27 रुपये प्रती लिटर.

पुणे   पेट्रोल 106.75 रुपये प्रती लिटर, डिझेल 93.20 रुपये प्रती लिटर.

नाशिक  पेट्रोल 106.78 रुपये प्रती लिटर, डिझेल 93.24 रुपये प्रती लिटर.

औरंगाबाद  पेट्रोल 108.00 रुपये प्रती लिटर, डिझल 95.92 रुपये प्रती लिटर

नागपूर  पेट्रोल 106.06 रुपये प्रती लिटर, डिझेल  95.57 रुपये प्रती लिटर

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -