ताजी बातमी ऑनलाईन टीम
बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरील मजरे कारवेयशवंतनगर येथील पुलावरून मारुती कार थेट नदीत गेली. कार मधील मुरकुटेवाडीचे दाम्पत्य बालबाल बचावले. ही घटना आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
मुरकुटेवाडी (ता. चंदगड) येथील कल्लाप्पा वैजू बाणेकर हे आपल्या पत्नीसह बेळगावला गेले होते. परत गावी येतांना त्यांचा गाडीवरील ताबा सुटला व पुलाच्या अलिकडे सरळ नदीत शिरली यावेळी तेथून जाणाऱ्यांनी तात्काळ दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले. मात्र पाण्याचा प्रवाह जोराचा असल्याने कार वाहून गेली. काही तरुणांनी पाण्यातून वाहून जाणारी कार बाहेर काढली. मजरे कारवे येथील हांझहोळ नदीत कार कोसळल्यानंतर अथक प्रयत्नाने कारवे ग्रामस्थांनी दाम्पत्यांना बाहेर काढले.