ताजी बातमी ऑनलाईन टीम
नसीम मुबारक सतारमेकर पत्ता झेना साहेब दर्गा पाठीमागे
मिरज या महिलेने 2019 साली 55 हजार रुपये कर्ज सर्फराज देसाई त्याची पत्नी शंनो देसाई राहणार सुंदर नगर मिरज यांच्या कडून घेतले होते रोज 300 रुपये व्याज 1500 रोज हप्ता देण्याच्या ठरला होता आज पर्यंत नसीम सतारमेकर यांनी देसाई दाम्पत्याला तीन लाख 50 हजार रुपये परत केले आहेत तरी सर्फराज देसाई त्याची पत्नी शंनो देसाई व कर्जाचा हप्ता वसुलीसाठी येणार मोहसीन शहापूरे यांनी एक लाख 84 हजार बाकी आहे असे म्हणून 4 हजार रुपये महिन्याला हप्ता असे 46 हप्ते देण्याचे मागत होते पैसे दिले नाही.
म्हणून नसीम यांच्या कडून बँकेचा कोरा चेक वर सही करून घेतले वारंवार धमकी शिवीगाळ दिल्याने सावकारांच्या जाचाला कंटाळून शेवटी नसीम सतारमेकर यांनी मिरज शहर पोलिसांत धाव घेतली खाजगी सावकार पती सर्फ राज देसाई त्याची पत्नी शंनो देसाई व कर्ज वसुली करणार मोहसीन शाहापुरे या तिघांच्यावर बेकायदेशीर खाजगी सावकारी करण्याचा गुन्हा मिरज शहर पोलिसांत दाखल झाला आहे.