ताजी बातमी ऑनलाईन टीम
लाभाची पदे मिळणार म्हणून ठिकठिकाणचे सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक या “शिंदे छत्री” खाली उद्या गोळा झाले तर तो चमत्कार नक्कीच नव्हे! कारण शिवसेनाप्रमुखांच्या मातोश्रीला एकटे पाडण्यासाठीच तर या शिंदे छत्रीची प्रतिष्ठापना दिल्लीश्वरांनी केली. शिंदे गटाला आता उद्धव ठाकरे नकोत, ‘मातोश्री’ नावाचा रिमोट कंट्रोल नको. सत्ता मिळवून देणारा बँड म्हणून शिवसेना मात्र हवी आहे ती ही छत्री चालावी म्हणून!
शिवसेनेतील बंडाळीचा दुसरा अंक न्यायालयात आणि तिसरा जनतेच्या न्यायालयात सादर होईल. महाराष्ट्राला या दोन्ही अंकांची प्रतीक्षा आहे. तोपर्यंत या बंडाळीचे बोट धरून जी सोंगे सादर होत आहेत त्यावरून उद्याचा अंदाज बांधता येतो. बंडखोर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे या दोघांत शिवसेना कुणाची, यावरून संघर्ष सुरू आहे. उद्धव यांच्या बाजूने ठाकरे आडनाव आहे आणि शिवसैनिक ज्याला तीर्थक्षेत्र मानतात ते ‘मातोश्री’ निवासस्थान आहे. याचा अर्थ साक्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अधिष्ठान त्यांच्या मागे भक्कम उभे आहे. असे अर्थात उद्धव यांना वाटते. शिंदे तसे मानत नाहीत.
कोण ठाकरे, असा उद्दाम सवाल फक्त त्यांनी केलेला नाही; मात्र त्याही पुढे जात आम्हीच शिवसेना आहोत, आमचीच शिवसेना खरी, असे शिंदे सतत सांगत आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी शिंदे दिल्लीत गेले तेव्हा शिंदे यांचे सूत्रसंचालक देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केलेले विधान मोठे सूचक आहे. ‘आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याच शिवसेनेशी युती केली आहे, असे फडणवीस म्हणाले. थोडक्यात, ठाकरेंना पूर्णत: बाद करायचे आणि शिवसेना हायजॅक करायची याचा पूर्ण आराखडाच शिंदे गट आणि भाजपने मिळून तयार केलेला दिसतो. त्याचे शिवसेनेवर होणारे परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत.
“शिंदे छत्री” की ठाकरे ? संघर्ष शिवसेना नावाच्या बँडसाठी!
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -