Friday, August 1, 2025
Homeब्रेकिंगराज्यात पावसाने आतापर्यंत घेतला 102 जणांचा बळी, हवामान खात्याकडून अलर्ट जारी!

राज्यात पावसाने आतापर्यंत घेतला 102 जणांचा बळी, हवामान खात्याकडून अलर्ट जारी!

मान्सून (Monsoon) दाखल होऊन एक महिना झाल्यानंतर राज्यात 1 जुलैपासून पावसाने जोर धरला आहे. पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे (Maharashtra Rainfall) राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी 1 जूनपासून ते आतापर्यंत 102 लोकांचा बळी गेला आहे. भुस्खलन, वीज अंगावर पडून तर पूरामध्ये वाहून जाऊन या लोकांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसामुळे घराचे, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे अनेक भागामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचे पाणी घरामध्ये शिरल्यामुळे संसारउपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. पूरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटाला आहे. पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राज्यामध्ये 14 एनडीआरएफ (NDRF) आणि 5 एसडीआरएफच्या (SDRF) पथकांकडून बचावकार्य सुरु आहे.

राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेक जिल्ह्यांना बसला आहे. या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. पूराच्या पाण्याचा वेढा अनेक गावांना घातला आहे. या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गडचिरोली, भंडारा, पालघर, चंद्रपूर, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे आणि मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे आतापर्यंत 102 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

या पावसामुळे आतापर्यंत 183 जनावरांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूरस्थिती असलेल्या भागांमध्ये 14 एनडीआरएफ आणि 5 एसडीआरएफ पथकांकडून बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत 11 हजार 836 जणांना पूरातून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. राज्यात पुढचे काही दिवस पावसाचा जोर कमी असेल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -