Sunday, July 6, 2025
Homeतंत्रज्ञान‘बीएमडब्लू’ची बाईक भारतात लाॅंच, फक्त 3999 रुपयांमध्ये न्या घरी…!!

‘बीएमडब्लू’ची बाईक भारतात लाॅंच, फक्त 3999 रुपयांमध्ये न्या घरी…!!

‘बीएमडब्लू’.. अनेकांनी हे नाव ऐकलं, वाचलं असेल.. आलिशान कार उत्पादनासाठी हा ‘ब्रॅंड’ ओळखला जातो.. या गाड्यांच्या किंमती पाहूनच अनेकांचे डोळे पांढरे होतात.. त्यामुळे सर्वसामान्य माणूस शक्यतो ‘बीएमडब्लू’ची कार घेण्याचे स्वप्नही पाहत नाही.. मात्र, आता तुमचं स्वप्नं पूर्ण होऊ शकतं..

‘बीएमडब्लू’ची कार नाही, तर किमान बाईक तरी तुम्ही घेऊ शकाल.. होय, या कंपनीने नुकतीच भारतात आपली बाईक लाॅंच केलीय. बीएडब्लू मोटर्ड (BMW Motorrad)ने आपली प्रीमियम व लक्झरी बाईक 2022 BMW G 310 RR भारतीय बाजारात आणली आहे. दोन व्हेरिअन्टमध्ये ही बाईक उपलब्ध झाली आहे..

भारतीय बाजारात ही बाईक आणताना, कंपनीने लगेच बाईकचे ‘प्री-बुकिंग’ही सुरू केलंय. विशेष म्हणजे, ही बाईक तुमच्या बजेटच्या बाहेर नाही. भारतीय बाजारात चांगली स्पोर्ट्स बाईक घ्यायची झाली, तर त्यासाठी किमान 2 लाखांहून अधिक रक्कम मोजावी लागतेच..अशा वेळी ‘बीएमडब्लू’ची बाईक एक उत्तम पर्याय ठरू शकते.

‘बीएमडब्लू’च्या या बाईकमध्ये उत्कृष्ट लूक नि जबरदस्त रायडिंगचा अनुभव मिळेल. या बाइकमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स असून, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

बीएमडब्लूबाईकची वैशिष्ट्ये

  • नव्या BMW G 310 RR मध्ये 313cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन दिलेले आहे. ते 33.5bhp पॉवर आणि 28Nm पीक टॉर्क जनरेट करते. बाईकचे इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशन गिअर बॉक्सशी जोडलेले आहे.
  • बाइकमध्ये 4 रायडिंग मोड मिळतात. ट्रॅक व स्पोर्ट मोडमध्ये बाइकचा टॉप-स्पीड 160 Km/h आहे. रेन व अर्बन मोडमध्ये या बाइकचा टॉप स्पीड 125Km/h इतका आहे. बाइकचे कर्व्ह वेट 174 किलो आहे.
  • बाईकच्या सीटची लांबी 811 मिमी आहे. बाईकचा इनर कर्व्ह 1830 मिमी आहे. बाईकमध्ये 11 लिटरचा युझेबल फ्युअल टँक आहे, तसेच अॅल्युमिनिमची व्हिल्स दिले आहेत.
  • बाईकचा पुढील टायर 110/70 R 17 आणि मागील टायर 150/60 R 17 चा आहे. मागील बाजूस प्री-लोड अॅडजस्टेबल सस्पेंशन दिले आहे. सुरक्षेसाठी, यात ABS सह सिंगल डिस्क फ्रंट ब्रेकही असेल.

शिवाय, बाईकमध्ये अँटी-हॉपिंग क्लच, चेन ड्राइव्ह, रिव्होल्युशन काउंटर, एलईडी फ्लॅश टर्न इंडिकेटर, एलईडी टेल लाईट, एलईडी हेडलाइट, 5-इंचाची टीएफटी इन्फो फ्लॅट स्क्रीन देण्यात आली आहे. या स्क्रीनमध्ये अनेक मोड्स असून, ते सोयीनुसार बदलता येतील. रायडिंग किलोमीटर, रायडिंग मोड, मॅक्झिमम स्पीड, घोषणा, तापमान आदींची माहिती स्क्रीनवर मिळेल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -