Friday, November 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात दाम्प्त्यासह नदीत कोसळली कार

कोल्हापूर : दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात दाम्प्त्यासह नदीत कोसळली कार

समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एक कार (car) थेट नदीमध्ये कोसळली. ही घटना कोल्हापूरातील चंदगड तालुक्यातील मजरे कारवे येथे घडली. घटनेनंतर मदतीसाठी तत्काळ लोकांनी धाव घेतल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. बेळगाव-वेंगुर्ला रोडवर शुक्रवारी सांयकाळी मजरे कारवे नजीकच्या हांजहोळ नदीवरील पुलावर पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

नशीब बलवत्तर म्हणून कारमधील (car) दोघंही सुखरूप बचावले. कल्लाप्पा बाणेकर, रेश्मा बाणेकर हे दाम्पत्य आपल्या गावी मुरकुटेवाडीकडे निघालं होतं. त्यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविताना कलाप्पा यांचं कारवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे कार बेळगाववेंगुर्ला रोडवर असलेल्या हाजहोळ नदीजवळील पुलाजवळून नदीत कोसळली.

सुदैवाने घटना घडली तेव्हा तिथे काही लोक । उपस्थित होते. हे सगळं बघताच तडशिनहाळचे उपसरपंच रामलिंग गुरव आणि बेळगाव येथील दोन पर्यटक यांनी क्षणाचीही विचार न करता नदीत उतरुन कारमधील दाम्पत्याला बाहेर काढलं. त्यामुळे सुदैवाने जिवीतहानी टळली. कल्लाप्पा हे शिनोळी येथील कंपनीत नोकरीला आहेत. कंपनीतील कल्लाप्पा यांच्या सहकाऱ्यांना याबाबत समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संगम पाटील आणि बिर्जे यांनी मोठे धाडस करत वाहून जाणारी कार दोरीने झाडाला बांधली. त्यानंतर कार नदीतून काढण्याचा प्रयत्न झाला पण पाऊस आणि चिखलामुळे यात यश आलं नाही. परंतु सुदैवाने कारमधील दाम्प्त्याचा जीव वाचला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -