मुलीला जेवण दिले नाही म्हणून सुनेने सासूची हत्या (Daughter In Law Killed The Mother In Law) केल्याची खळबळजनक घटना पुण्यातील (Pune City) चाकण येथील पंचवटी सोसायटीमध्ये घडली आहे. या प्रकरणी चाकण पोलिस स्टेशनला (Pune Crime) सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यात (Pune) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता हादरवून टाकणारी ही घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री मुलीला भाकर न दिल्याच्या रागातून सासू आणि सुनेत वाद झाला. दोघानाचा हा वाद विकोपाला जात दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यातच सुनेनं चक्क नायलॉनच्या दोरीने सासूचा गळा आवळला. यामध्ये सासू सुष्मा ह्या बेशुद्ध झाल्या. काही वेळानंतर सुष्मा यांचा मुलगा सागर हा कामावरुन घरी आला. त्यानंतर त्याच्या पत्नीने सासू फिट येऊन बेशुद्ध पडल्याचे सांगितले. दरम्यान, सागरने आई सुषमाला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी 71 वर्षीय सुष्मा मुळे यांना मृत घोषित केले.
रुग्णालयातील डॉक्टरांना ही हत्या असल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत माहिती चाकण पोलिसांना दिली. पोलिसांनी सुष्मा यांचा मुलगा सागर अशोक मुळे आणि सून सुवर्णा सागर मुळे यांची कसून चौकशी केली असता, आपणच सासूचा खून केल्याची कबूली सुवर्णाने दिली. सासू सुष्मा आणि सून सुवर्णा यांच्यात वारंवार किरकोळ कारणावरून वाद होत होते. दरम्यान, पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, पुणे शहरासह परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. गुन्हेगारीच्या या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
15 दिवसांपूर्वी मुलाने केली होती आईची हत्त्या…
पुण्यात सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वीच पुण्यातल्या भोरमधील धन्वंतरी प्लाझा या इमारतीतील मुलाने आपल्या सावत्र आईची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली होती. वडिलांनी दुसरे लग्न केल्याचा राग मनाशी बाळगून मुलाने सावत्र आईची हत्या केली. या घटनेत आरोपी 22 वर्षांच्या मुलाने सावत्र आईचा आधी गळा चिरला त्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगडी वरंवटा घालून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे त्यावेळी पुण्यात एकच खळबळ उडाली होती.