ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ; शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले संजय मंडलिक व धैर्यशील माने हे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार शिंदे गटासोबत राहणार असल्याचा दावा राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मंडलिक व माने हे दोन्ही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आहेत. त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू आहे. हे दोन्हीही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय लवकरच जाहीर करतील. या दोघांनी एकाच वेळी हा निर्णय जाहीर करावा, अशी प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, धैर्यशील माने यांनी गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याच्या निर्णयातील जाचक अट दूर कराव्यात, अशी मागणी केली होती. हा निर्णय जाहीर करताना शिंदे यांनी त्यांच्या नावाचा उल्लेख केला होता.