Tuesday, December 24, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : अंबाबाईसाठी दोन महिन्यांत नवा रथ

कोल्हापूर : अंबाबाईसाठी दोन महिन्यांत नवा रथ

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईसाठी आता लवकरच नवा रथ केला जाणार आहे. रथाचे लाकूड खराब झाल्याने हा नवा रथ तयार केला जाईल. त्यासाठी कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील सागर येथून मागवलेले लाकूड कोल्हापुरात आले आहे. लवकरच रथ तयार करण्याचे काम सुरू होणार आहे.

हा रथ दोन वेळा खराब झाला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याचे परीक्षण करून या रथावर सातपेक्षा अधिक लोकांना बसण्यास मनाई केली होती.



चेन्नई येथील बस्तीलाल पटवा (जैन) या भाविकाने या रथासाठी लागणारे लाकूड देवस्थान समितीला दिले आहे. ते सध्या टेंबलाई मंदिराच्या परिसरात ठेवण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुतार या रथाचे काम करणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -