Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री दोन दिवसांत एकत्र येणार, दीपाली सय्यद यांचे सूचक...

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री दोन दिवसांत एकत्र येणार, दीपाली सय्यद यांचे सूचक ट्वीट

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत शिवसेनेच्या 40 आणि 10 अपक्ष आमदारांनी शिंदे गटात सहभाग घेतला. त्यानंतर राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घ्यावी असे आवाहन वारंवार करण्यात येत होते. त्याचसोबत शिवसैनिकांची देखील हिच इच्छा होती. अशामध्ये आता शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी सूचक ट्वीट केले आहे. दीपाली सय्यद यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.



शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमत्री एकनाथ शिंदे चर्चा करण्यासाठी एकमेकांना भेटणार असल्यासंदर्भात ट्वीट केले आहे. या भेटीसाठी मध्यस्थी केल्याबद्दल त्यांनी भाजपचे धन्यवाद आभार देखील मानले आहेत. दिपाली सय्यद यांनी ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, ‘येत्या दोन दिवसांत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहेत. या मध्यस्तीकरता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल.’ दीपाली सय्यद यांच्या या ट्वीटमुळे चर्चांना उधाण आहे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -