Tuesday, July 29, 2025
Homeराजकीय घडामोडीद्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा, कोण होणार देशाचे नवे राष्ट्रपती?, आज होणार...

द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा, कोण होणार देशाचे नवे राष्ट्रपती?, आज होणार मतदान

देशाच्या 16 व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election 2022 ) आज मतदान होणार आहे. राष्ट्रपती पदाच्या खुर्चीवर नेमकं कोण विराजमान होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजपने राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवारी दिली आहे. तर विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना उमेदवारी दिली आहे. द्रौपदी मुर्मू की यशवंद सिन्हा यापैकी कोण देशाचे राष्ट्रपती होणार हे आज स्पष्ट होईल.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी 10 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. राज्यांच्या विधानसभा आणि संसद भवनांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये लोकसभा-राज्यसभेचे आमदार आणि उमेदवार मतदान करणार आहेत. संसद भवनातील पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक 63 मध्ये मतदान होणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत बॅलेट पेपरद्वारे मतदान होणार आहे. बॅलेट पेपरवर राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावाविरुद्ध खासदारांना त्यांची पसंती नोंदवावी लागते. गुरुवार 21 जुलै रोजी निकाल लागतील आणि त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या जागी कोण येणार हे स्पष्ट होईल. त्यानंतर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलै रोजी शपथ घेतील.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 4809 लोकप्रतिनिधींना मतदानाचा अधिकार असेल. लोकसभेचे 543 खासदार, राज्यसभेचे 233 खासदार आणि 4033 विविध राज्यांमधील आमदारांमधून नव्या राष्ट्रपतींची निवड होईल. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात सरळ लढत होणार आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदासाठी मतदान करणाऱ्या जवळपास 60 टक्के जणांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित असल्याचा मानला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -