Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात 104 नागरिकांचा मृत्यू, वाचा पावसाचे सध्याचे अपडेट्स..

राज्यात 104 नागरिकांचा मृत्यू, वाचा पावसाचे सध्याचे अपडेट्स..

राज्यात 73 तात्पुरती निवारा केंद्र तयार, आतापर्यंत 11 हजार 836 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. आतापर्यंत अतिवृष्टीमुळे 104 नागरिकांचा मृत्यू (नाशिक, नागपूरमध्ये सर्वाधिक बळी), 275 गावांना पुराचा फटका तर अंदाजे 189 प्राणी दगावले.

राज्यात अनेक ठिकाणी 2-3 दिवसांच्या विश्रांतीनुसार पुन्हा कुठे जोरदार तर कुठे मुसळधार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला अलर्ट; मराठवाडा विभागातील जवळपास 3 लाख 38 हजार 88 हेक्टरचे नुकसान, पंचनामे सुरु, अहमदनगरमध्ये संततधार

गडचिरोली जिल्ह्यातील तेलंगणाच्या टोकावरील सिरोंचा येथे भयावह स्थिती: वैनगंगा- प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या संगमस्थळी पाण्याची आवक सुरू असल्याने गेले 4 दिवस हे तालुक्याचे शहर चारही बाजूने पाण्याने वेढले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 40 गावातील नागरिकांचे ताज्या पुरात स्थलांतर, यातील तब्बल 34 गावे सिरोंचा तालुक्यातील.

हिंगोली जिल्ह्यात एक दिवसाच्या विश्रांतीनंतर रात्री जोरदार पाऊस, मध्यरात्री पावसाने हजेरी लावली. यंदा जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 477 मिलिमीटर पावसाची नोंद, शेतीची कामे खोळंबली.

देशातील सर्वात मोठं मातीचं धरण समजल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा 72.61 टक्के झाला, धरणात अजूनही 45 हजार 892 क्युसेकने आवक सुरूच

अमरावतीत रात्रभरापासून रिपरीप पाऊस सुरु, अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 13 दरवाजे 150 सेमी ने उघडले तर अचलपूर तालुक्यातील वझ्झर धरणाचे 2 दरवाजे उघडले.

राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी 9 तुकड्या: मुंबई -3, पुणे-2 अशा एकूण 5 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-2, नागपूर-2 अशा एकूण 4 राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -