‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटातून नॅशनल क्रश बनलेल्या रश्मिका मंदानाची लोकप्रियता आता दक्षिणेतून हिंदी बेल्टपर्यंत पोहोचली आहे. ही दाक्षिणात्य अभिनेत्री जिथे जाते, तिथे तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड गर्दी करत असतात. तिची अशीच एक झलक नुकतीच एका अॅवॉर्ड शोमध्ये पाहावयास मिळाली.
या अॅवॉर्ड शोमध्ये रश्मिकाला पाहण्यासाठी चाहत्यांनी तिच्या भोवती गराडाच घातला. तिने चाहत्यांना निराश केले नाही. याशिवाय तिने ‘सामी सामी..’ या गाण्याचे काही स्टेप्सही सादर केले. यावेळी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये रश्मिका फारच बोल्ड दिसत होती. तिचा हा अल्ट्राग्लॅमरस अवतार चाहत्यांना फारच भावला.
रश्मिकाने याप्रसंगी छायाचित्रे आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. वर्क फ्रंटचा विचार करावयाचा झाल्यास रश्मिका लवकरच ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करताना दिसणार आहे. याशिवाय ती ‘पुष्पा : द रूल’मध्येही दिसणार आहे.