ताजी बातमी ऑनलाईन टीम
जत; जाडरबोबलाद (ता.जत) येथील एका खासगी वाहन चालकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. श्रीशैल निलाप्पा सायगाव (वय ४५) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. ही घटना आज (दि.१८) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
श्रीशैल यांचा अतिशय निघृणपणे तोंड, डोके ठेचून खून करून जाडरबोबलाद – मारोळी रस्त्यालगतच्या ओढापात्रात मृतदेह टाकण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री घडली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. मृतदेहाजवळ रक्तांनी माखलेली कपड्याची पिशवी आढळून आली आहे. हा खून करून इथे मृतदेह आणून टाकला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. चेहरा पूर्णपणे विद्रूप करण्यात आला आहे. चेहऱ्यावर पेट्रोल टाकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.