Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर विमानतळासाठी अतिरिक्त भूसंपादन डिसेंबरअखेरपूर्ण

कोल्हापूर विमानतळासाठी अतिरिक्त भूसंपादन डिसेंबरअखेरपूर्ण

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर विमानतळासाठी अतिरिक्त 64 एकर जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया डिसेंबर अखेर पूर्ण होईल, असे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांनी सोमवारी सांगितले. कोल्हापूर विमानतळाला मोठी संधी आहे, त्यानुसार विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले.

नलवडे म्हणाले, कोल्हापूर विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणासाठी अतिरिक्त 64 एकर जागेची आवश्यकता आहे. याकरिता 212 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी 103 कोटी रुपये राज्य शासनाने उपलब्ध करून दिले आहेत. मौजे मुडशिंगी येथील 1 हजार 69 खातेदार तर तामगाव येथील 5 खातेदार जागा मालकांची एकूण
64 एकर जागा संपादित केली जाणार आहे. ही संपादन प्रक्रिया डिसेंबर अखेर पूर्ण होईल, असे नियोजन केले आहे.

राज्यात मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि शिर्डी नंतर कोल्हापूर विमानतळाचा सध्या क्रमांक लागतो. यामुळे कोल्हापूर विमानतळाला मोठी संधी आहे. जमीन संपादनाचे काम पूर्ण झाल्यानंतर मोठी विमाने उतरण्याची सुविधा विर्माण होईल, परिणामी कोल्हापूरचे विमानतळ जगाच्या नकाशावर येणार असल्याचे नलवडे यांनी सांगितले. त्यामुळे कोल्हापूरसह शिर्डी, नाशिक आणि नांदेड विमानतळाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -