बॉलिवूडचे ज्येष्ठ पार्श्वगायक भूपिंदर सिंग यांनी जगाचा निरोप घेतला आहे. सोमवारी संध्याकाळी मुंबईत वयाच्या 82 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. भूपिंदर सिंग यांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज गायकांसोबत काम केले. मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले यांसारख्या गायकांसोबत त्यांनी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. वेगळ्या धाटणीच्या आवजासाठी ते ओळखले जात होते.
काही दिवसांपासून ते लघवीच्या समस्यांसह अनेक आरोग्यविषयक गुंतागुंतांनी त्रस्त होते,अशी माहिती त्यांची पत्नी मिताली यांनी दिली. त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. भूपिंदर सिंग यांना “मौसम”, “सत्ते पे सत्ता”, “आहिस्ता आहिस्ता”, “दूरियां”, “हकीकत” आणि इतर अनेक चित्रपटांमधील त्यांच्या संस्मरणीय गाण्यांसाठी ओळखले जाते.
ज्येष्ठ गायक भूपिंदर सिंग यांचे निधन, वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -