ताजी बातमी ऑनलाईन टीम
एनएसई फोन टॅपिंग प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. सकाळपासून सुरु असलेल्या चौकशीनंतर माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारीही ईडीकडून पांडे यांची चौकशी करण्यात आली होती. सीबीआयनेही देखील त्यांना प्रश्नोत्तरे केली. दोन्ही एजन्सीकडून चौकशी झाल्यानंतर मंगळवारी पांडे यांना ईडीने अटक केली आहे.
चित्रा रामकृष्ण या 2013 ते 2016 या कालावधीत नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. त्यावेळी संजय पांडे यांच्या कंपनीच्या माध्यमातून एनएसई कर्मचाऱ्यांच्या फोन टॅपचे प्रकरण समोर आले होते. ईडीला या टॅपिंगची माहिती मिळाली मिळताच, त्यांनी तात्काळ गृह मंत्रालयाला कळवले आणि त्यानंतर सीबीआयनेही या प्रकरणात हस्तक्षेप केला. आता याच टॅपिंग प्रकरणात चौकशीनंतर ईडीने संजय पांडे यांना अटक केली आहे. संजय पांडे यांच्या कंपनीला टॅपिंगसाठी 4.45 कोटी रुपये मिळाल्याचा दावाही करण्यात आला आहे. चित्रा रामकृष्ण यांनाही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती.