Tuesday, December 24, 2024
Homeइचलकरंजीहर घर तिरंगा अभियानात इचलकरंजी सहभागी होणार

हर घर तिरंगा अभियानात इचलकरंजी सहभागी होणार



आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण होण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने सुरु केलेले ‘हर घर तिरंगा’ अभियान त्याचाच एक भाग आहे. या उपक्रमांतर्गत इचलकरंजी शहरातील ५६ हजार १९० मालमत्तांवर तिरंगा ध्वज फडकवण्यात येणार आहे.

या अभियानात ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत देशभरातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे नियोजन आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबत संबंधित महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींना आदेश दिले आहेत. त्यानुसार इचलकरंजीतही महापालिका, शासकीय इमारती, सहकारी सस्था, शाळा-महाविद्यालये आणि मालमत्ता अश ५६ हजार १९० ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवण्यात येणार आहे. हा तिरंगा ध्वज आणि त्यासाठीची काठी शहराच्या चार क्षेत्रीय कार्यालयातून वितरीत केली जाणार असून तिरंगा ध्वजासाठी ३० रुपये आणि काठीला ७ रुपये मोजावे लागणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -