हातकणंगले येथील तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांच्या सहकारी पतसंस्थेत १ कोटी ५८ लाखापेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याप्रकरणी चेअरमन, सचिव, शाखाधिकारी अशा दहा जणांवर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद लेखापरीक्षक सुभाष देशमुख यांनी दिली आहे. हातकणंगले तालुका प्राथमिक शिक्षक सेवकच्या सहकारी पतसंस्थेचे १/४/२०१९ ते ३१/३/ २०२० या आर्थिक वर्षाचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश जिल्हा आणि तालुका उपनिबंधक सहकारी संस्था यांनी पतसंस्थेत दिड कोटीचा अपहार शासकीय लेखापरीक्षक सुभाष दादासाहेब देशमुख यांना दिले होते.
त्यात त्यांना अपहार केल्याचे दिसून आले. या प्रकरणी तत्कालीन चेअरमन बाबासो दादा पाटील, सचिव हिंमतराव दत्तू पोळ-देसाई, शाखाधिकारी धन्यकुमार जनगोंडा पाटील, शाखाधिकारी बाळासो शामराव गारे, अशोक श्रीपाल मुरचिटे, सुरेश जिनपाल मुरचिटे, भरत बापूसो उपाध्ये, विजयकुमार भगवान शिंगे, ऋषीकेश हिंमतराव पोळ आणि अभिजित गोपाळ देसाई या १० जणांविरुद्ध १ कोटी ५८ लाख ३८ हजार २४० रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे




