देशात सध्या फेसबुकवरून झालेल्या मैत्रीतून अनेकांची फसवणूक होताना दिसत आहे. दरम्यान राज्यातही या घटनांमध्ये वाढ झाली आहे. फेसबुकवरून झालेल्या प्रेमातून महाराष्ट्रातील एक तरुणीला फसवण्यात आल्याची माहितीसमोर येत आहे.
महाराष्ट्रातील उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथील तरूणासोबत तिचे प्रेम होते. ते घरी न सांगता पळून गेले आहेत. तो तिच्यासोबत एक वर्ष या दोघांनी संसार केला अन् भांडण झाल्यावर तिला मुरादाबाद येथे सोडून तो पळून गेला आहे. जेव्हा पीडितेने बलात्काराची तक्रार नोंदवली तेव्हा हे प्रकरण तुरुंगात जाऊ नये म्हणून तिने एका मंदिरात जाऊन लग्न केले. यानंतर फिरण्याच्या बहाण्याने हस्तिनापूर येथे नेऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने नदीत ढकलून दिले होते. या सगळ्या घटनेत प्रियकर नवरा तिला सोडून गेल्याने ते जिते राहत होते तेथील घरमालकाने घरातील सामान बाहेर काढून त्यांना हकलले आहे. तरुणीने पतीच्या मित्रांवरही बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत त्या पिडीतेने पोलिसांत तक्रार दिल्यावर डीएम बीके त्रिपाठी आणि एसपी आदित्य लंघे यांनी कारवाईला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील रहिवासी असने एका तरुणीने 2018 साली फेसबुकच्या माध . अमरोहा येथील एका तरुणाशी मैत्री केली.
फेसबुकवरील मैत्रीनंतर दोघांमधील प्रेम वाढू लागले. जानेवारी 2019 मध्ये तो तिला भेटण्यासाठी पुण्याला आला आणि तिला घेऊन अमरोहा येथे गेला. पहिल्यांदा त्याने तिला दिल्ली येथे नंतर गाझियाबादमध्ये ठेवल्याचे तपासात निष्पण्ण झाले आहे. जवळपास वर्षभर दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. यादरम्यान शारीरिक संबंधही ठेवल्याची त्या पिडीतेने तक्रारीत नमुद केले आहे.मार्च 2019 मध्ये आरोपीने मित्रांच्या मदतीने अमरोहा येथील विकास कॉलनी येथील निवासस्थानी पत्नी म्हणून ठेवले. त्याच दरम्यान डिसेंबर 2019 मध्ये तीला मुरादाबादमध्ये सोडण्यात आल्याची माहिती पिडीतेने दिली आहे. या सगळ्या घटनेत ती खडतर प्रवास करत अमरोहा येते येत आरोपी प्रियकराविरुद्ध अमरोहा ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, खटल्यात तुरुंगात जाऊ नये म्हणून तिने 12 जानेवारी 2020 रोजी लग्न केले होते.
पिडीतेने दिलेल्या महितीनुसार त्यांच्यात वारंवार भांडणे व्हायची 1 एप्रिल 2021 रोजी ते दोघेही मित्रांसोबत फिरण्यासाठी गेले होते. यावेळी तीला नदीकाठावरून ढकलून दिल्याचीही माहिती तिने दिली. या घटनेत ती वाचली असल्याचे तिने सांगितले. दरम्यान या घटनेत तिने पतीवर गुन्हा दाखल केला होता यावेळी तो जामीनावर सुटला होता. यानंतर ही तो तिच्या संपर्कात राहिल्याचे तीने सांगितले. मुलीच्या जबाबाच्या आधारे बलात्कार प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे.या सगळ्या घटनेनंतर नातेवाईकांच्या उपस्थितीत एकत्र राहण्याचे आश्वासन त्या युवकाने दिले होते.
बिजनौर रोडवरील कल्याणपुरा येथे भाड्याचे घर घेऊन तो तेथे राहू लागला. त्याचे मित्रही घरात ये-जा करत होते, असा आरोप त्या पिडीतेने दिला आहे. मार्च 2022 मध्ये तिच्या पतीच्या मित्राने दारूच्या नशेत तिच्यावर बलात्कार केल्याचाही तीने आरोप केला आहे. तिच्यावर अत्याचार करत अश्लिल व्हिडीओ बनवल्याचेही तीने म्हंटले आहे. पीडितेचा आरोप आहे की, चार दिवसांपूर्वी घरमालकाने तिचे सर्व सामान फेकून दिले आहे. शेजाऱ्यांनी तीला आसरा दिल्याची माहिती दिली आहे. पीडितेने सोमवारी डीएम बीके त्रिपाठी यांना तक्रार पत्र दिले आहे. मंगळवारी पीडितेने एसपी कार्यालयात तक्रार पत्र देऊन आरोपी पतीवर कारवाई करण्याची मागणी केली.