Apple दरवर्षी आयफोन सोबत काही ना काही नवीन फीचर्स आणत असते. सध्या apple कंपनीचा iPhone 14 लाँच होण्याच्या प्रतीक्षेत आहे. आयफोनच्या या नवीन सीरिज बद्दल बाजारपेठेत जोरदार चर्चा आहे. हेडफोन जॅक, चार्जरला डब्यात टाकल्यानंतर आता आयफोन मधून आणखी एक कम्पोनेंटची कपात केली जाणार आहे. बहुचर्चित iPhone 14मध्ये फिजिकल सिम ट्रे नसणार आहे. Apple या नवीन फोनसाठी eSim ऑप्शन देण्याची प्लानिंग करीत असून आयफोन लव्हर्ससाठी ही अत्यंत धक्कदायक बाब असणार आहे.
द वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की Apple कंपनी निवडक बाजारात iPhone 14 साठी केवळ eSIM ऑप्शन आणणार आहे. जर ग्राहकांना ही नवीन कल्पना आवडली नाही तर Apple iPhone 14 चे फिजिकल सिम कार्ड स्लॉट सोबत विक्री करेल असं देखील बोललं जात आहे.
Apple मागील काही दिवसांपासूनच अमेरिकेत काही ठिकाणी eSIM-only मॉडलची तयारीसाठी चर्चा करीत आहे. . eSIM मॉडल Apple ला मोठ्या बॅटरी सोबत मोठ्या कंम्पोनेंटला करण्यासाठी आतील जागी जबरदस्त उपयोग देते आणि सोबतच eSIM एका सोबत अपडेट रोलआउट करण्याची परवानगी देते.
iPhones मध्ये वर्षांपासून ई-सीम ठेवण्याचा विचार केला जात होता आणि हे पहिल्यांदा iPhone XS आणि iPhone XR जनरेशन सोबत दाखवण्यात आले होते. Appleने या दोन फोनसोबत प्राथमिक eSIM कनेक्शनची परवानगी दिलेली आहे. फिजिकल सिम कार्ड स्लॉट सोबत ही टेक्नोलॉजी आयफोनला एक ड्युअल सिम स्मार्टफोन बनवत असल्यामुळे याची कमालीची चर्चा आहे. आता Appleचे युजर्स या फोनला कसा प्रतिसाद देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.