हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात पावनखिंडीच्या पराक्रमाला इतिहासात तोड नाही. गारद करणे,पन्हाळगड व आग्राहून शिवरायांचे अकल्पित बुद्धी चातुर्याने निसटून जाणे या इतिहासातील महतत्वाच्या घटना आहेत.
या ऐतिहासिक गड वाटा,युद्ध वाटा दुर्ग भटक्यांकडून जिवंत ठेवण्याचे मोठे कार्य महाराष्ट्रात अनेक संस्था करताना दिसून येतात. अशीच एक मोहीम पन्हाळागड ते पावनखिंड (pawankhind) या 48 किमीच्या ऐतिहासिक मार्गावर वारी करण्यात आली. यात राज्यभरातून सातशे जणांसह दुर्गजागर प्रतिष्ठान – संस्थापक संतोष जगताप यांचा सहभाग होता.
हिल ॲडवेंचर फाऊंडेशन ही संस्था गेल्या वीस वर्षापासून पन्हाळा ते पावनखिंड 48 किमी ऐतिहासिक वाटेची पायी वारीचे आयोजन करीत आहे. 16 व 17 जुलै रोजी पार पडलेल्या पायी वारीत महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे, ठाणे, नाशिक, मुंबई, बीड आदी जिल्ह्यातून सुमारे 700 जण सहभागी झाले होते.
शनिवारी सकाळी आठ वाजता वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे पुजन आणि त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मोहिमेला सुरूवात करण्यात आली. यावेळी दुर्गराज राजगड ग्रंथाचे लेखक राहुल ऊर्फ रायबा नलावडे पुणे व एका पायाने दिव्यांग असूनही सातत्याने दुर्ग भटकंती करणारे बीडचे कचरू चांभारे यांचा आयकॉन म्हणून आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला. शिव व्याख्याते राहुल नलावडेयांच्या मनोगतानंतर मोहीमेस सुरूवात करण्यात आली. अंगावर पाऊसधारा झेलत मसाईचे पठार ,कुंभारवाडी, खोतवाडी, करपेवाडी, आंबेवाडी मार्गे मोठमोठे नदी ओढे पार करत चिखल तुडवत शिवरायांच्या नामजयघोषात,हर हर महादेव च्या जयघोषात शिवप्रेमीधावत होते.या वारीतील दपारचे जेवण खोतवाडीला व रात्रीचा मुक्काम आंबेवाडीत झाला.
कोल्हापूर ; पन्हाळागड ते पावनखिंड 48 किमीच्या ऐतिहासिक मार्गावर वारी; राज्यभरातून 700 जणांचा सहभाग
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -