ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई, भारतीय क्रिकेट मधील दिग्गज आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार व सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) हा लेजंड लीग क्रिकेटचा ( legends league cricket) भाग बनणार आहे.
लेजंड क्रिकेट लीगच्या दुसऱ्या सत्रात तो खेळणार असल्याचे त्याने स्वत: स्पष्ट केले. या बाबत बोलताना सौरव गांगुली म्हणाला, इतर दिग्गज खेळाडूंसोबत खेळताना खूप मजा येईल’.





