सांगली जिल्ह्यातील तासगाव शहरात चिंचणी परिसरात एका तरुणाने विजेच्या खांबावर चढत आत्महत्या करण्याचा प्रयत्न (assay) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमारे अर्धा तास या तरुणाचा विजेच्या तारांसोबत जीवघेणा खेळ सुरु होता. प्रशांत केशव माळी असे या तरुणाचे नाव आहे. पत्नी नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातून प्रशांतने हे धक्कादायक कृत्य केले असल्याचे समोर आले आहे.
प्रशांत हा विजेच्या खांबावर चढत असतानाच तिथल्या अनेक लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न (assay) केला. परंतु तो कोणाचेही न ऐकता वर चढला. त्यामुळे प्रशासनाला वीज प्रवाह बंद करावा लागला. तो तसाच खांबाच्या एकदम टोकावर जाऊन तारांशी छेडछाड करू लागल्याने लोकांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कोणाच्याचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. किमान अर्धा तास विजेच्या तारांशी खेळत होता. विजेच्या तारांवरुन चालण्याचाही प्रयत्न त्याने केला.
यावेळी प्रशांतचे हे कृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामुळे वाहतुकीचाही मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला होता. मात्र प्रशांतचा विजेच्या खांबावर लटकून सूरु असलेला थरार पाहून नागरिकांचा आणि प्रशासनाचा जीव मात्र टांगणीला लागला होता. अखेर तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर प्रशांतला खाली उतरवण्यात आलं आणि त्याचा विजेचा तारांशी सुरु असलेला जीवघेणा खेळ संपवला.