Friday, May 9, 2025
Homeसांगलीसांगली पोलीस मुख्यालयातील चंदनाची झाडे चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक…चार हजारांचे चंदन जप्त…

सांगली पोलीस मुख्यालयातील चंदनाची झाडे चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक…चार हजारांचे चंदन जप्त…

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सांगलीतील पोलीस मुख्यालयाच्या आवारातील चंदनाची झाडे काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्याने कापून पळवली होती या चोरी प्रकरणाची प्रसारमाध्यमातून बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर या चोरीच्या अनुषंगाने तपासाची चक्रे फिरवल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या टीमला दोघा चंदन चोरट्यांना ताब्यात घेण्यात यश आले आहे.गोपनीय खबर्यामार्फत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संदीप पाटील विक्रम खोत संकेत मगदूम यांना दोन इसम वानलेस वाडी परिसरात चंदनाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

त्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार पाटील आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्यासह पोलीस अंमलदारांनी छापा मारून अभिमन्यू आनंद चंदनवाले वय 32 राहणार, मालगाव रोड, शिंदे हॉल जवळ मिरज. वरमेश भीमराव चंदनवाले वय 36 राहणार मंगळवार पेठ मिरज या दोघात चंदन चोरट्यांना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून चार हजार रुपये किमतीचे चंदनाचे कापलेले तुकडे जप्त करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -